”नौदलाच्या गणवेशावर आता शिवरायांची राजमुद्रा”, पंतप्रधान मोदींकडून दोन मोठ्या घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सिंधुदुर्ग :- नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तारकर्ली इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोणत्याही देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचं आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज ओळखून होते. त्यामुळे त्यांनी शक्तिशाली नौसेना बनवली. त्यांचे सगळे मावळे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत.
मोदी पुढे म्हणाले, भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. नौसेनेच्या ध्वजाला मागच्या वर्षी महाराजांच्या विचारांशी जोडता आलं, हे माझं भाग्य आहे. आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावं देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.
मोदी पुढे म्हणाले की, सशस्त्र दलांमध्ये नारीशक्ती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. नौसेनेचं अभिनंदन करतो, की नेव्हलशीपमध्ये देशातल्या पहिल्या महिला कमांडर ऑफिसरची नियुक्ती केली आहे. शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना बोट बनवण्याची कला पुन्हा विकसित करणं गरजेचं असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..