जनता जनार्दन की जय..! MP मध्ये शिवराज सिंह ५ व्यांदा CM बनण्याच्या वाटेवर…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भोपाळ :- मध्य प्रदेशातील २३० जागांचे निकाल आज रविवारी (दि.२) जाहीर होत आहे. मध्य प्रदेशात पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची जादू दिसून आली आहे. मध्य प्रदेशात भाजपने १५० च्यावर आघाडीवर आहे.
तर काँग्रेस ७४ जागांवर आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलानुसार, मध्य प्रदेशात भाजपला यश मिळत असल्याचे दिसत असल्याने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी X वर पोस्ट करत ‘भारत माता की जय, जनता जनार्दन की जय’ असा नारा दिला आहे.
‘आज मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत आणि मला विश्वास आहे की जनतेच्या आशीर्वादाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. भाजपच्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.’ असे शिवराज चौहान यांनी म्हटले आहे.
सकाळी १०.४५ वाजेपर्यंतचे कल लक्षात घेता मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान पाचव्यांदा मुख्यमंत्री बनण्याच्या वाटेवर आहेत.
राज्यात १७ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. राज्यात ७७.८२ टक्के विक्रमी मतदान झाले होते, जे २०१८ च्या निवडणुकीपेक्षा २.१९ टक्के अधिक आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये विजयासाठी जोरदार रस्सीखेच होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण सुरुवातीच्या कलानुसार भाजप पुन्हा सत्तेत येत असल्याचे दिसून येत आहे.
मध्य प्रदेशातील सर्व २३० विधानसभा जागांसाठी सकाळी ८ वाजता कडेकोट बंदोबस्तात ५२ जिल्हा मुख्यालयात मतमोजणी सुरू झाली. मध्य प्रदेशात कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी ११६ चा जादुई आकडा आवश्यक असेल. येथे चारवेळा शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री राहिले आहेत. आता पाचव्यांदा ते सत्ता राखताना दिसत आहेत. तर कमलनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस मागे पडताना दिसून येत आहे.