सरकारने पॅकेजचा पुनर्विचार करावा, शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे द्यावेत : राहुल गांधी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सरकारनं रेटिंग्स तसंच जगातील प्रतिमेचा विचार आज या काळात करु नये. देशातील शेतकरी, मजूर, महिला, तरुण देशाचं रेटिंग्स बनवतात. लोकांच्या खिशात पैसा नसेल तर लोकं काय खाणार? असा सवाल करत शेतकरी, मजुरांना खिशात पैसे द्यावेत अशी मागणी काॅंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. आज त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मागणी आणि पुरवठ्याचं गणित सुधारण्यासाठी पैसे देणं गरजेचं आहे. हे पैसे राज्य सरकार अथवा केंद्र सरकारमार्फत द्या किंवा कसेही द्या पण पैसे द्या, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. तसंच सावधगिरीनं लॉकडाऊन शिथिल करण्याची गरज आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे. या काळात त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शेतकरी, मजुर, कष्टकरी हा अर्थकारणाचा पाया आहे. त्यांना सरकारने मदत करायलाच हवी. नुसतं पॅकेज जाहीर करून चाणार नाही तर त्यांच्या खिशात पैसे जायला हवेत, असं ते म्हणाले. लोकांच्या खिशात जर पैसे नसतील तर लोक काय खाणार? असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारने सावकाराचं काम करू नये, अशी टीका केली आहे.
ते म्हणाले की, भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करु नका, ते रेटिंग नंतर सुधारु शकेल. सध्या भारताच्या मजूर, शेतकऱ्यांच्या काळजीचा विषय आहे. ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या, रेटिंग आपोआप सुधारेल, असं राहुल गांधी म्हणाले.
लॉकडाऊनसंदर्भात राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाउन हा काही इव्हेंट नाही तर ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेताना विशेष काळजी घेऊन योग्य त्या रणनितीनुसारच पुढेही निर्णय घ्यावा लागेल, असेही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे. लॉकडाऊन जास्त दिवस ठेऊन चालणार नाही. सावधगिरीने लॉकडाऊन शिथील करण्याची गरज असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….