40 एकरवर सभा, 80 एकरावर पार्किंग, जालन्यात जरांगेंची भव्य सभा ; स्वागतासाठी फुलांनी भरलेले 140 जेसीबी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जालना :- मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. 1 ते 12 डिसेंबर असा त्यांचा दौरा असेल.
त्याआधी जरांगेच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच जालन्यात त्यांची एक जाहीर सभा होणार आहे. दुपारी एक वाजता या सभेचे आयोजन करण्यात आलंय. नवीन मोंढा परिसरात 40 एकर मैदानावर ही भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. तर 80 एकर जागा ही पार्किंगसाठी आहे.
जरांगेंच्या सभेआधी जालना शहरात त्यांच्या स्वागतासाठी फुलांनी भरलेल्या 140 जेसीबी तयार ठेवल्या आहेत. याशिवाय व्यासपीठावर 100 फुटांचा भव्य पुष्पहार देखील क्रेनच्या माध्यमातून लावण्यात येणार आहे. ही सभा ऐतिहासिक करण्यासाठी आयोजकांचे प्रयत्न सुरु मनोज जरांगे आज काय बोलणार हे पाहावं लागेल. सभेनंतर जरांगेंचा मुक्काम अंतरवाली सराटीतच असेल.
कोणावर निशाणा साधणार?
मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हिंगोली येथील सभेतून भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे उद्याच्या सभेत जरांगे कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. विशेष म्हणजे आंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणात ऋषिकेश बेदरेला अटक करण्यात आली असून, यावर देखील आपण सभेत स्पष्ट भूमिका मांडणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. त्यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका आता बदलू नयेत असेही जरांगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री यांच्याबद्दल देखील या सभेतून जरांगे आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी देखील पूर्ण झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी शहरात 40 हजार चौरस फुटांचे होर्डीग्स आणि कटआऊट्स लावण्यात येणार असून सकल मराठा समाजाच्या बॅनर्सवर सर्व समाजातील थोर महापुरूषांचे फोटो लावण्यात येणार आहे. सभेत होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांसोबतच सकल मराठा समाजाचे दहा हजार स्वंयसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. जिल्हाभरातून तसेच अन्य ठिकाणावरून समाजबांधव मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
वाहतुकीत बदल…
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना शहरातील पांजरपोळ मैदान येथे उद्या (1 डिसेंबर) रोजी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाचे नागरीक छत्रपती संभाजी महाराज पुतळा या ठिकाणी एकत्र येवून मोटार सायकल रॅली काढणार आहेत. तरी, या मोटार सायकल रॅलीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, रस्ता मोकळा राहावा व रस्त्यावर वाहने उभी राहुन मार्गात वाहनांमुळे अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि वाहतुकीचे नियमन व नियंत्रण होणे गरजेचे आहे. याकरिता खालील मार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे, असे आदेश पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी जारी केले आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!