विलगीकरण कक्षामध्ये दाखल होण्याची सुचना न पाळणाऱ्या अकरा व्यक्तींवर गुन्हा दाखल
उमरखेड :
तालुक्यामध्ये इतर जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात नागरीक परत येत आहे . अशा नगरीकांना त्यांच्या एकंदर बाबींचा विचार करून त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येतो . ज्या नागरीकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले असते त्यांनी कोणत्याही परीस्थीती मध्ये विनापरवानगी विलगीकरण कक्ष परीसरातुन बाहेर जावयाचे नसते . दिंडाळा येथे विलगीकरण कक्षामध्ये असलेले एकूण अकरा नागरीक विनापरवाना विलगीकरण कक्षातुन निघुन स्वत:च्या घरी राहावयास गेले . या व्यक्तींना संबंधित तलाठी यांनी विलगीकरण कक्षामध्ये राहण्याचे सुचित केले मात्र त्यांनी विलगीकरण कक्षामध्ये दाखल होण्याची सुचना पाळली नाही . त्यामुळे एकूण अकरा व्यक्तींवर भारतीय दंड संहीता १८६० व साथीचे रोग अधिनियम १८९७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गुन्हा दाखल केलेल्या अकरा व्यक्तींमध्ये जयसिंग सटवा राठोड , पिंकी जयसिंग राठोड , कृष्णा उत्तम जाधव , सुरेखा उत्तम जाधव , गीता सटवा राठोड , लता सटवा राठोड , सविता स्वामी आडे , राम मोहन राठोड , पुजा राम राठोड , मोहन गोविंद राठोड , सुशिला मोहन राठोड अशी यांची नावे आहे .विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलेल्या सर्व नागरीकांना सुचीत करण्यात येते की विलगीकरण कालावधी पुर्ण झाल्या शिवाय कोणीही विलगीकरण कक्ष परिसर सोडू नये असे तहासिल प्रशासनाच्या वतीने कळविले आहे .