विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखल केला अर्ज
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल केला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी हा अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात येऊन विधान परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सोपवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही होत्या. तसंच आदित्य ठाकरेही होते.
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे ५ तर भाजपाचे ४ उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी दोन उमेदवार दिल्याने तिढा निर्माण झाला होता.मात्र तो सुटला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली खरी, मात्र ते विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे सदस्य नव्हते. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. आता २१ मे रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..