बुलडाणा जिल्हा कोरोना मुक्त ; तिघांना दिली केंद्रातुन सुट्टी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुलडाणा :
नागपूर मधील कामठी येथील तिघांना दहा एप्रिल रोजी बुलडाणा येथील कोविड हाउस्पिटल केंद्रातून सुटी देण्यात आली. आता बुलडाणा जिल्ह्यात एकही कारोना बाधीत रुग्ण राहलेला नाही. जिल्हा कोरोना मुक्त झाल्याने नागरिकात आनंदाचे वातावरण आहे. पुढील २८ दिवस एकही कारोना बाधीत रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात आढळून न आल्यास बुलडाणा जिल्हा ग्रीन झोनमध्ये जाऊ शकतो. त्यादृष्टीने आता प्रशासकीय पातळीवर अधिक सतर्कता राखण्यात येत आहे.पश्चिम वरहाडात कोरोना संसर्गामुळे बुलडाणा जिल्ह्यात 28 मार्च रोजी पहिला बळी गेला होता. त्यामुळे केद्र शासना समोबतच राज्य शासनाच्या दृष्टीने बुलडाणा जिल्हा एक संवेदनशील जिल्हा म्हणून समोर आला होता. त्यानंतर सातत्याने
( टाळ्या वाजवून प्रोत्साहन देताना जिल्हाधिकारी डॉ.सुमन चंद्रा,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित व अन्य )
बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण सापडत गेले ही सख्या २४ वर पोहोचली होती. 25 एप्रिल दरम्यान नागपुर जिल्ह्यातील कामठी येथून बुलडाणा येथे धार्मिक कार्यक्रमा निमित्त आलेल्या ११ पैकी तीन जण कोरोना पाझीटीव्ह असल्याचे उघड़ झाले होते. त्यामुळे
बुलडाण्याची ग्रीन झोनकडे असलेली वाटचाल अचानक ऑरेंज झोनमध्ये परावर्तीतझाली होती. अखेर दहा एप्रिल रोजी या तीनही जणांचे सलग दोन रिपोर्ट १३ व्या दिवशी निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आनंदाने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णांचे स्वागत केले. कोरोनावर मात केलेल्या तीनही रूग्ण समाधानाच्या भावमुद्रेत बाहेर पडले. कोरोना निगेटीव्ह रूग्णांना जिल्हाधिकारी यांनी डिस्जार्ज पेपर दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना इच्छितस्थळी सोडण्यात आले त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात सध्या एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण नाही.
जिल्ह्यात चिखली येथे तीन, चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन, सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे नऊ कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील पाच, शेगांव येथील तीन, चितोडा ता. खामगांव येथील दोन, चिखली येथील तीन, मलकापूर येथील चार, सिंदखेड राजा येथील एक आणि दे.राजा येथील दोन, कामठी येथील 3 कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे
जिल्ह्यात आतापर्यंत ७४८ जणांच्या चाचण्या घेण्यात
आल्या असून त्यापैकी ६१५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले.२४ जण पॉझीटीव्ह
आढळून आले होते. यापैकी एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता. दरम्यान,
सापडलेले उर्वरित २३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ स्वॅब नमुन्याचे अहवाल अकोला प्रयोग शाळेत प्रलंबी आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील ११ प्रतिबंधीत क्षेत्राताली ९२ हजार ५४६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.