बेंगळुरूमध्ये फटाक्यांच्या गोदामाला आग ; १४ जणांचा होरपळून मृत्यू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बंगळुरू :- बेंगळुरू-होसूर महामार्गावरील फटाक्यांच्या गोदामाला काल (दि. ७) संध्याकाळी भीषण आग लागली. या आग दुर्घटनेत आत्तापर्यंत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती कर्नाटक डीजीपी आलोक मोहन यांनी दिली आहे.
कर्नाटकचे डीजीपी आलोक मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागलेल्या फटाक्याच्या गोदामात ३५ लोक काम करत होते. या आगीच्या दुर्घटनेत १४ कामगारांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात दुकान मालक आणि त्याच्या मुलाला आता अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरात पोलिस पुढील कारवाई करत असल्याची माहिती देखील कर्नाटक डीजीपींनी दिली आहे. (Bengaluru Fire)
कर्नाटकचे डीजीपी आलोक मोहन म्हणाले, ‘हे फटाक्याचे दुकान आहे. काल दुपारी आग लागली आणि या आगीच्या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. आम्ही योग्य पद्धतीने तपास करू. एकूण ५ जण आरोपी आहेत. प्रकरण आणि मालकासह 2 जणांना अटक करण्यात आली आहे. आम्ही विविध एजन्सींच्या चुकांचाही शोध घेऊ. तपासादरम्यान आगीचे कारण कळेल.’
बेंगळुरू-होसूर महामार्गावर अट्टीबेले येथे आज अटीबेले फटाका कारखान्याला आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण आगीला पाहून आजूबाजूच्या परिसरात लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर या दुकानामध्ये फटाके भरलेले होते. आजच्या भीषण दुर्घटनेने हा संपूर्ण परिसर हादरला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….