मुंबई, पुणे, नागपूर शहरांतून मान्सूनची माघार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मान्सूनने शनिवारी राज्याच्या 45 टक्के भागातून परतीला सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे व नागपूर या शहरातून प्रथमच एकाचवेळी मान्सून माघारी परतला आहे.आगामी तीन दिवसांत तो राज्यातून पूर्णपणे माघार घेईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून राज्यातून मान्सून माघारी परतण्यास सुरुवात झाली. गुरुवारी उत्तर महाराष्ट्रातून, तर शुक्रवारी पुणे, नागपूर, अलिबाग या शहरांतून तो माघारी फिरण्यास सुरुवात झाली होती. तर शनिवारी मुंबई, पुणे, नागपूरमधून तो पुढे सरकला. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली असून, तापमान 35 अंशांवर गेले, तर रात्रीच्या तापमानात 1 ते 1.5 अंशांनी घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पहाटे दाट धुके
मान्सून माघारी फिरताच शहरांवर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहवयास मिळत आहे. उत्तररात्री 3 ते पहाटे 6 वाजेपर्यंत दाट धुके पडत आहे. तर सकाळी 7 ते 9 दरम्यान हलके धुके जाणवत आहे .पहाटे मोठ्या प्रमाणावर दवबिंदू पडलेले पाहावयास मिळत आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….