उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे एकमेव ‘राष्ट्रसंत’ तुकडोजी महाराज यांना केले अभिवादन…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगणघाट :- श्री संत भोजाजी महाराज देवस्थान सभागृह, हिंगणघाट (जिल्हा वर्धा) येथे आयोजित राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे उदघाटन आज केले. यावेळी खासदार रामदासजी तडस, आमदार समीर कुणावर, आमदार अशोक उईके, आमदार किर्तीकुमार भांगडिया, आमदार रामदास आंबटकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विदर्भ ही संतांची भूमी आहे. विदर्भातील तीन संतांनी प्रबोधनाचे खूप मोठे काम केले आहे. प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराजांनी मोठ्या प्रमाणात प्रबोधन साहित्याची निर्मिती केली. संत गाडगे बाबांनी स्वच्छतेचा संदेश दिला. यासोबतच त्यांनी जातीभेद आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे मोठे कार्य केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भारतभर मानवतेचा विचार पोहोचविण्याचे आणि प्रबोधनाचे कार्य केले. राष्ट्रसंतांनी संपूर्ण समाजाला दिशा देण्याचे काम केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी युवा पिढीवर अनेक चांगले संस्कार केले. वाईट सवयी आणि परंपरा दूर सारल्या. लोकांमध्ये गरीबांची आणि समाजाच्या सेवेची भावना रुजवली. त्यांनी एक उत्तम पिढी घडवली आणि त्या पिढीने एका सशक्त समाजाची बांधणी केली.
तुकडोजी महाराजांच्या भजनांमध्ये समाजातील प्रश्न आणि त्यांचे उपाय दिसून येतात. भजनातून जनजागृती करण्याबरोबरच त्यांनी चांगल्या विचारांचा प्रसारही केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मराठी आणि हिंदीमध्ये १२०० भजने लिहिली. त्यांची ही भजने देशभर लोकप्रिय झाली. राष्ट्रपती भवनात तुकडोजी महाराजांच्या भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. तत्कालीन मा. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे महाराजांच्या भजनाने प्रभावित झाले होते. त्यांनीच महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी दिली. तुकडोजी महाराज हे एकमेव असे संत आहेत ज्यांना मा. राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रसंत’ या पदवीने सन्मानित केल्या गेले आहे.
तुकडोजी महाराजांचे साहित्य आणि विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या साहित्य संमेलनातून होणार आहे. आपल्या प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे साहित्य म्हणजे ग्रामगीता. ही ग्रामगीता म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाला दिलेली मोठी देणगी आहे. स्वयंपूर्ण गाव कसे तयार होईल, आपणच आपले शिल्पकार कसे होऊ शकू हे ग्रामगीता सांगते. महाराजांचे विचार, साहित्य, भजने ही आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे साहित्य संमेलन अतिशय चांगले माध्यम आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….