मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, एका वक्तव्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा अडचण सापडण्याची शक्यता आहे. कारण आता मराठा समाजाकडे कोणतेही पुरावे नसले तरी आरक्षण हवंय आणि ते द्यावेच लागेल, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
हिंगोलीमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलन स्थळी भेट देण्यासाठी जरांगे पाटील आले होते. यावेळी येत्या 14 तारखेला जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजातील प्रत्येकाने उपस्थित राहण्याचा आव्हान देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
जरांगे पाटलांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली आहे. दरम्यान ओबीसी नेत्यांची भूमिका ही सरकारची भूमिका नाही, सरकारने समिती स्थापन केली आहे. आमच्याकडे वेळ मागितला आहे, त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मिळणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच आरक्षण मिळेपर्यंत सरकारला सुट्टी नाही, असंही ते म्हणाले.
एकीकडे मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई लढतोय. तर दुसरीकडे कुणबी मराठा हा ओबीसी समाजाबरोबर मराठ्यांना आरक्षण देऊ नये यासाठी आंदोलन करत आहे. या विरोधात आता मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणाऱ्या जरांगे पाटलांनी कठोर भूमिका घेतली आहे.
ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मराठा समाजाने बळ देऊ नये असं आवाहन त्यांनी केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर ज्यांना प्रमाणपत्र काढायचं त्यांनी काढा, ज्यांना काढायचं नाही त्यांनी काढू नका, मात्र छगन भुजबळ यांना ताकद देऊ नका, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..