नागपुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अनेक डझन खुर्च्या तुटल्या, हुल्लडबाजांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि हुल्लडबाजी हे समीकरण झालं आहे. नागपुरातही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अनेक डझन खुर्च्या तुटल्या. शिवाय हुल्लडबाज तरुणांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार देखील केला.
हुल्लडबाजांनी तुटलेल्या खुर्च्यांचे तुकडे हवेत भिरकावले
नागपुरात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात जोरदार हुल्लडबाजी झाली. नागपुरातील हिल टॉप परिसरात एकता गणेशोत्सव मंडळाने शुक्रवारी (29 सप्टेंबर) गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. गौतमी पाटील कार्यक्रमासाठी सुमारे दोन तास उशिरा पोहोचली. त्यानंतर तिचं नृत्य सुरु होताच तरुणांनी जोरदार गोंधळ सुरू केला. अनेक तरुण तिथे लावण्यात आलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्यांवर उभे झाले. त्यामुळे मोठ्या संख्येने प्लास्टिकच्या खुर्च्या तुटल्या. काही हुल्लडबाजांनी तुटलेल्या खुर्च्यांचे तुकडे हवेत भिरकावले.
पोलिसांकडून हुल्लडबाजांवर सौम्य लाठीमार
तर पाठीमागची गर्दी वारंवार समोरच्यांना धक्का देत असल्यामुळे अनेक वेळेला समोरचे बेरिकेट खाली कोसळले आणि त्यामुळे गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.
दिंडोरीत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजीला फाटा
तीन दिवसांपूर्वी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वलखेडमध्ये हुल्लडबाजीला फाटा देण्यात आला. दिंडोरीच्या एकता मित्र मंडळाने गौतमी पाटील यांचा कार्यक्रम कुठलीही हुल्लडबाजी न होता पार पाडला. महिलांसह रसिकांनी कार्यक्रमांचा खास आस्वाद घेताना गौतमी पाटीलने थेट व्यासपीठावरुन खाली उतरुन महिला प्रेक्षकांमध्ये जाऊन नृत्याची अदाकारी यावेळी सादर केली. आयोजकांचे सुयोग्य नियोजन पाहून गौतमी पाटीलनेही समाधान व्यक्त केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..