राजकीय समीकरणं बदलणार! निवडणुकांतील विरोधानंतर ‘हे’ दिग्गज नेते आले एकत्र ; काय आहे कारण…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे संबंध ताणले गेले आहेत.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपासून कऱ्हाड तालुक्यातील राजकीय नेत्यांची घडी विस्कटली आहे.
त्यामुळे ज्या नेत्यांनी एकमेकांच्या साथीने निवडणुका लढवल्या ते कऱ्हाड दक्षिण आणि उत्तरचे आमदार बाजार समितीच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले होते.
त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली. त्या निवडणुकानंतर पहिल्यांदाच खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), भाजपचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले (Atul Bhosale) हे नेते येथील बटाणे गल्लीतील श्री गणेशाच्या दर्शनासाठी एकत्र आले. त्याचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
कऱ्हाड तालुका हा कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तर या दोन मतदार संघातील विभागला आहे. कऱ्हाड दक्षिणवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचेच वर्चस्व आहे, तर कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मध्यंतरी झालेल्या सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत माजी सहकारमंत्री आमदार पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली.
त्या निवडणुकीत आमदार पाटील आणि आमदार चव्हाण गटाची जुळलेली नाळ तुटली. त्यावेळी आमदार पाटील यांना भाजपचे अतुल भोसले यांनी साथ दिली. त्यामुळे त्या निवडणुकीत आमदार पाटील यांचा विजय झाला. दरम्यान, त्याचवेळी यापुढील सर्व सहकारी संस्थांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमदार पाटील आणि भोसले गटाने एकत्रीतपणे लढवाव्या, अशी घोषणा त्या पॅनेलच्या ज्येष्ठांना केली होती.
त्यानुसार कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणुक आमदार पाटील, अतुल भोसले यांनी संयुक्तपणे पॅनेल टाकुन लढवण्याची घोषणा केली. त्यावेळी सत्ताधारी अॅड. उदयसिंह उंडाळकर यांनीही स्वतंत्रपणे पॅनेल टाकून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यांना माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी थेट प्रचारात उतरुन साथ दिली. त्या निवडणुकीत अॅड. उंडाळकर यांच्या पॅनेलचा विजय झाला.
त्यामुळे तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे संबंध ताणले गेले आहेत. त्या निवडणुकानंतर पहिल्यांदाच येथील बटाणे गल्लीतील श्री गणेशाच्या दर्शनासाठी खासदार पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण, माजी सहकारमंत्री आमदार पाटील, भाजपचे कार्यकारणी सदस्य भोसले हे नेते एकत्र आले. त्याचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
खासदार श्रीनिवास पाटील कॉमन मॅन
खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या वक्तृत्व शैलीतून आणि विकासकामांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्याकडे विकास कामांची मागणी करण्यासाठी सर्वपक्षीय लोक जातात. त्यांच्याकडेही गट-तट न पाहता विकास कामे दिली जातात, असे अनेकांचे अनुभव आहेत. त्यातच तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे राजकीय निवडणुकांतून संबंध ताणलेले असले तरी खासदार पाटील यांचे मात्र सर्वांबरोबर चांगले संबंध आहेत. त्यामुळे खासदार पाटील यांच्याकडे कॉमन मॅन म्हणून पाहिले जाते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..