“त्यासाठी १४५ आमदार लागतात” अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदावरुन मोहित कंबोज यांनी डिवचलं…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांना सोबत घेऊन अजित पवार यांनी २ जुलै रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर वारंवार अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल चर्चा होते आहे. बुधवारी लालबागच्या राजासमोर एका कार्यकर्त्याने एक चिठ्ठी अर्पण केल्याने पुन्हा राजकारण पेटलं आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, मुख्यमंत्री होण्यासाठी ४५ नव्हे तर १४५ आमदार सोबत लागतात. हे त्यांचं ट्वीट अप्रत्यक्षरित्या अजित पवारांना उद्देशून असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे भाजपमधल्याच काही लोकांना अजित पवार मुख्यमंत्री म्हणून नको आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बुधवारी अजित पवार यांच्या समर्थकाने लालबागच्या राजासमोर एक चिठ्ठी अर्पण केली. त्या चिठ्ठीमध्ये अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. यापूर्वीदेखील राज्यातील अनेक भागांमध्ये अजित पवार भावी मुख्यमंत्री, अशा आशयाचे फ्लेक्स झळकले होते.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांच्या संभाव्य मुख्यमंत्रीपदाविरोधात ट्वीट केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मागे अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पायउतार करुन भाजप अजित पवारांनी संधी देईल, अशा शक्यता वर्तवण्यात आलेल्या होत्या. मात्र मुख्यमंत्रीपदाबाबत अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही.
दरम्यान, मोहित कंबोज यांनी सदरील पोस्ट दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान डिलिट केली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..