“आमदार अपात्र प्रकरणात दिरंगाई होणार नाही, पण.”, राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दरबारी प्रलंबित आहे. मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण अध्यक्षांकडे वर्ग केल्यानंतर आतापर्यंत दोनवेळाच सुनावणी झाली.
दुसऱ्या सुनावणी दरम्यान या प्रकरणी वेळापत्रक तयार करणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी राहुल नार्वेकर यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
१६ आमदारांच्या अपात्र प्रकरणाविषयी राहुल नार्वेकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, “या विषयावर अधिक बोलणं उचित राहणार नाही. या याचिका ठरवत असताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई केली जाणार नाही. परंतु, कोणत्याही प्रकारची घाईही केली जाणार नाही. ज्यामुळे अन्याय होईल. कालच्या निकालात सुनावणी कशी होणार, त्याची प्रक्रिया काय असणार यासंदर्भातील माहिती सर्व पक्षकारांना दिली आहे. त्याचप्रमाणे ही कारवाई पुढे जाईल. लवकरच यासंदर्भातील निकाल देऊन या विषयाला मार्गी लावू.”
“अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. न्यायालायनेही योग्य ती सूचना दिली आहे. न्यायालयाचा मान राखला जाईल. अध्यक्षांचीही बाजू न्यायालयात मांडली जाईल”, असंही स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी होत असलेल्या दिरंगाईबद्दल दिलं.
दुसऱ्या सुनावणीत काय झालं?
विधानसभा आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकांवरील सुनावणी लांबणीवर गेली आहे. प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्यायची की एकत्रित यासंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर १३ ऑक्टोबरला देणार आहेत. वेळकाढूपणा न करता एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाने अध्यक्षांकडे केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..