2024 पूर्वी भाजप पक्ष देखील फुटलेला असेल ; ठाकरे गटाच्या खासदाराचा दावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारी करत आहेत. मात्र त्याआधीच भाजपला मोठा धक्का बसला असून एआयएडीएमके पक्षाने भाजपसोबत सर्व प्रकारचे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थात एआयएडीएमके पक्षाने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
संजय राऊत म्हणाले की, एनडीए सध्या कमजोर आहे. ज्या एनडीएमध्ये शिवसेना आणि अकाली दल नाही, ते एनडीए नाही. शिवसेना आणि अकाली दल हे एनडीएची ताकद होते. बाकीचे आले आणि गेले. आम्ही २५ वर्षे राहिलो. केवळ एनडीएच नाही, आणखी लोक भाजपमधून जातील. एवढचं नाही, तर २०२४ आधी संपूर्ण भाजपमध्ये देखील फूट पडणार असल्याचा दावा, राऊत यांनी केला.
आमदार अपात्रतेबाबत ते पुढं म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी अनेकदा पक्षांतर केलेलं आहे. त्यामुळे पक्षाबद्दल जी नीतिमत्ता असते, ती तपासावी लागेल. तसेच त्यांच्यावर केवळ सर्वोच्च न्यायालयाचा दबाव असून दुसरा दबाव नाही. मात्र त्यांनी त्या आधी वकील म्हणून शपथ घेतली आहे. राहुल नार्वेकर यांच्या कार्यकाळात आम्हाला घटनेचा खून होताना दिसत असल्याचही राऊत म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..