ठाकरे सेनेच्या कमानीवर गुवाहाटीचे चित्र ; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप, वाद चिघळण्याची शक्यता….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पोलिसांनी हस्तक्षेप करीत शिंदे गटाला स्वागत कक्ष, तर ठाकरे गटाला स्वागत कमान देऊन समझोता केला.
शिंदे-ठाकरे गटाच्या स्वागत कमानीने संघर्षाची ठिणगी शहरानंतर मिरज तालुक्यातही पडली आहे.
स्वागत कमानीवरील देखाव्यास शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेंद्र चांडाळ, मिरज शहरप्रमुख किरणसिंग रजपूत यांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे. स्वागत कमानीवरील छायाचित्रांवर आक्षेप घेतला आहे.
शहरातील संघर्ष मिरज तालुक्यातही पाहण्यास मिळत आहे. सुभाषनगर येथे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संजय काटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभारलेल्या स्वागत कमानीवर ‘यावर होऊदे चर्चा…’ मथळ्याखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची बंडखोरीसह गुवाहाटीतील बैठक, मणिपूर येथील हिंसाचार व दिल्ली येथील कृषी कायद्याविरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनाचे चित्र रेखाटले आहे.
मात्र या कमानीवर शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र चांडाळ, मिरज तालुकाप्रमुख किरणसिंग राजपूत यांनी आक्षेप घेतला आहे. मिरजेत गतवर्षी स्वागत कमानीच्या जागेवरून संघर्ष निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करीत शिंदे गटाला स्वागत कक्ष, तर ठाकरे गटाला स्वागत कमान देऊन समझोता केला.
यंदा पुन्हा शिंदे गट स्वागत कमान उभारणार असून मिरजेत महात्मा गांधी उद्यानासमोर कमानीची जागा निश्चित केली आहे. या कमानीसमोर किल्लाभाग येथील रस्त्यावर ठाकरे गटाला स्वागत कमानीसाठी परवानगी दिली आहे. यंदाही कमानी लक्षवेधी ठरत असून त्याच्यावरून नागरिकांना संदेश देण्याचा प्रयत्न संबंधित कार्यकर्त्यांकडून होत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..