शेतकऱ्यांसाठी दिलासा : महाराष्ट्राला मका आणि ज्वारी खरेदीसाठी केंद्र शासनाची परवानगी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ
राज्यातील मका ज्वारी उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र शासनाने मका आणि ज्वारी खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.त्यानुसार राज्याला 25 हजार मेट्रीक टन मका आणि 15 हजार मेट्रीक टन ज्वारी खरेदी करण्यात येणार आहे. यासंदर्भात कृषिमंत्री भुसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. राज्याने केंद्राकडे त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर केंद्र शासनाने परवानगी देणारं पत्र नुकतचं राज्याला पाठविले आहे.
केंद्र शासनाच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत राज्यात या खरेदीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या भरडधान्य खरेदी धोरणानुसार भारत अन्न महामंडळाच्या (एफसीआय) महाराष्ट्र प्रादेशीक शाखेमार्फत खरेदी केली जाणार आहे. खरेदी केलेले हे धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत ग्राहकांना वितरीत करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यतील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..