पत्रकार बाबाराव उबाळे यांचे वरिल हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकारचे उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन ; न्याय न मिळाल्यास लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पत्रकार बाबाराव उबाळे यांचे वरील हल्ल्या संदर्भात मोठ्या संख्येने पत्रकार बांधव यांनी एकत्र येऊन केला निषेध करित एसडीओ ना दिले निवेदन.,
न्याय न मिळाल्यास लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी अभियंता दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये स्वप्निल रमेश पवार नावाच्या ठेकेदाराने पत्रकार बाबाराव उबाळे यांना सार्वजनिक ठिकाणी विनाकारण वितंडवाद घालून धक्काबुक्की करून जातिवाचक शिवीगाळ करून जिवानीशी मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात पुसद शहर पोलीस स्टेशन येथे 16 सप्टेंबर 2023 रोजी तक्रार दाखल केली होती परंतु पोलिसांनी चौकशी करून चौकशी करतो असे सांगून दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा नोंद केला असताना सदर कॉन्ट्रॅक्टर हा पोलीस जमादाराचा मुलगा असल्याकारणाने स्थानिक पोलिसांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट चा गुन्हा नोंद झाल्या नंतरही त्याला बोलावून त्याच्याकडून दबाव तंत्र वापरण्यासाठी खंडणी सारखा गुन्हा दाखल करून घेतला परंतु ॲट्रॉसिटी ॲक्ट चा गुन्हा दाखल असताना सुद्धा त्याला अटक केली नाही यामुळे पत्रकारांवरच पोलीस विभागा मार्फत दबाव तंत्र वापरण्याचा प्रकार होत आहे याचाच निषेध म्हणून पुसद येथील शासकीय विश्रामगृहावर मोठ्या संख्येने पत्रकारांची निषेध सभा होऊन या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. व सामूहिक निवेदन उपविभागीय अधिकारी पुसद
यांचे मार्फत जिल्हा पोलीस अधिकारी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून पत्रकार बाबाराव उबाळे यांच्यावर खंडणी सारखा जो गुन्हा दाखल केला तो तात्काळ मागे घेण्यात यावा असे आशयाचे निवेदन सादर केले.
निवेदन उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी पुसद, व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार तथा प्रिंट मीडियाचे शेकडो पत्रकार प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..