सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक लाख हेक्टरी मदत द्या, आमदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंद्रपूर :- सोयाबीन पिकावर विविध कीड व रोग अचानकपणे आल्यामुळे तीनच दिवसांत संपूर्ण सोयाबीन पीक पिवळे पडून मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.
या पिकांवर मूळखूज, खोडखूज आणि पिवळा मोझॅक या रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे.
त्यामुळे पीक हंगामात हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान या जोखमीच्या बाबीअंतर्गत सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट एक लाख प्रती हेक्टरी मदत जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
आज आमदार प्रतिभा धानोरकर यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या चमूसोबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांवर आलेले संकट मोठे आहे. या रोगामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप पीक हातून गेले आहे. त्यामुळे तत्काळ शासनाने याकडे लक्ष देऊन पॅकेज जाहीर करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.
आज जिल्हास्तरीय समितीमधील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार, कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाहीचे डॉ. विनोद नागदेवते, कृषी अधिकारी विनोद कोसनकर, ओरियंटल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी कारपेनवार व चौधरी यांनी वरोरा तालुक्यातील विविध महसूल मंडलमधील चारगाव (बु), चारगाव (खुर्द) व वरोरा मंडळअंतर्गत शेंबळ, या गावातील सोयाबीन नुकसानग्रस्त क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यामध्ये आमदार धानोरकर यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी लोकप्रतिनिधी व संपूर्ण कृषी विभाग आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पिकावर कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेले उत्पन्न हिरावल्या गेले आहे. खरीप हंगामातील पीक हातचे गेल्याने रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले आहे. शेतकरी प्रचंड तणावाखाली आहे. संपूर्ण शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला नसून पीक विमा व्यतिरिक्त शासनाने या आलेल्या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी नैसर्गिक आपत्ती नुकसान या बाबीअंतर्गत प्रती हेक्टरी एक लाखाची मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
संपूर्ण वरोरा तालुक्यासह ईतर तालुक्यांतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात मिड सिजन अडवर्सिटी तत्काळ लागू करून तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना केल्या. या दौऱ्यात मंडळ कृषी अधिकारी, शेगांव बु. विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी घनश्याम पाटील, कृषी अधिकारी मारोती वरभे, उमाकांत झाडे, पंकज ठेंगणे, राजू चिकटे, योगेश वायदुळे, योगेश खामनकर, ईश्वर सोनेकर, संदीप थुल, बंडू शेळकी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..