विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या सुनावणीवर ठाकरे गटाकडून खुलासा ; म्हणाले , म्हणून त्यांनी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच काही केल्या सुटत नसल्याचे चित्र आहे. मात्र, यावर योग्य तो निकाल देण्याच्या प्रक्रियेला वेग येत असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडेबोल सुनावल्यानंतर ठाकरे गटानेही नार्वेकरांबाबत मोठा खुलासा केला आहे.
आता या प्रकरणात नेमके काय घडते ते पहावे लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणीस आजपासून सुरुवात झाली आहे. या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी सांगितले की, जेंव्हा सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणीची तारीख निश्चित केली तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी घाईघाईने 14 सप्टेंबर रोजी आमदार अपात्रतेबाबत सुनावणी घेतली. मात्र आता प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
न्यायालयाचाही आदर राखला पाहीजे
ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी रिजनेबल टाईम अर्थात योग्य वेळेत आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यात यावा, असे न्यायालयाने नमूद केले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. ज्याप्रकारे आम्ही तुमचा घटनात्मक संस्था म्हणून आदर राखतो, त्याचप्रकारे या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचाही आदर राखला पाहीजे असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर कपिल सिब्बल म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी अनेक महिने याप्रकरणी नोटीस बजावलेली नव्हती. आम्ही त्यांना आतापर्यंत तीन निवेदने दिली. त्यामध्ये 15 मे, 23 मे आणि 2 जून रोजी निवेदने दाखल केली. त्यानंतर 4 जुलै रोजी आम्ही याचिका दाखल केली. त्याच्या 10 दिवसांनी म्हणजेच 14 जुलै रोजी नोटीस जारी करण्यात आली आणि 14 सप्टेंबर रोजी हे प्रकरण विधीमंडळाच्या कामकाजात सूचीबद्ध करण्यात आलं. आम्ही जेव्हा अध्यक्षांकडे जातो तेव्हा त्यांचा प्रत्येक आमदाराने शंभर-शंभर उत्तरं देतात असाही युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..