रोड कॉन्ट्रेक्टर कडून पत्रकारास जातीवर शिविगाळ करून जीवेमारण्याची धमकी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- भ्रष्टाचार करण्यासाठी आमदार फंडातील रोड बांधकामाचे बोगस काम काम उघड होत असल्याचे पाहून पत्रकाराला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ठेकेदारावर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केलें आहे. दिनांक 16/09/2023 च्या सायंकाळी 8 वाजता अभियंता दिवसा निमित्य गनोबा मंगल कार्यालय माहुर रोड पुसद येथे कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते,,सदर कार्यक्रमात पुसद शहरातील अभियंता व मान्यवरा बरोबर पुसद येथील सर्वच पत्रकार यांना आमंत्रित करण्यात अले होते,,त्या कार्यक्रमा निमित्य पत्रकार बाबाराव उबाळे ही सदर कार्यक्रमा मंध्ये उपस्थित होते,, कार्यक्रम संपल्या नंतर 9:30 वाजता पत्रकार बाबाराव उबाळे हे आमदार वजाहत मिर्झा यांची मुलाखात घेत असताना तिथे ठेकेदार कॉन्ट्रेक्टर स्वप्निल रमेश पवार वय 28 वर्ष राहणार पुसद ,मोठ्याने आवाज करित अरेरवी करित तुम्ही माझ्या मुग्शी येथील कामावर का गेल असे बोलत पत्रकार बाबाराव उबाळे यांच्याशी वाद घातला धक्कामुक्की करित मारहाण केली व सर्वान समोर जातीवर् शिविगाळ केली,प्राप्त माहिती नुसार रोजी ठेकेदार स्वप्निल रमेश पवार यांचे रोड निर्माण करण्याचे काम मुंगशी येथे सुरु असून रस्ता निर्माण कार्य बोगस पद्धतीने केले जात आहे सदर रस्ता निर्माण कार्य भेसळ युक्त मटेरियल माती वापरून केले जात आहे अर्शी तक्रार मुंगशी येथील नागरिक करित होते व त्या निमित्य बाबाराव उबाळे यांना मुंगशी येथील गावकरी यानी दिनांक 29/08/2023 रोजी बोलावून बोगस रस्ता निर्माण कार्य दखविले होते, व बाबाराव उबाळे यांनी सदर बोगस कामाचे चित्रीकरण केले होते त्यांचा राग मनात ठेवून सदर ठेकेदार स्वप्निल रमेश पवार याने गनोबा मंगल कार्यालय येथे पत्रकार बाबाराव उबाळे यांना धकामुक्की करित मारहाण करित जातिवर शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी स्वप्निल पवार विरुद्ध ॲट्रॉसिटी सह विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहे.
सदर ठेकेदार स्वप्निल पवार यांचे वडील रमेश पवार हे पुसद वसंतनगर पोलिस स्टेशन ला कार्यरत असून बाप रक्षक तर बेटा भक्षक बनत आहे. चक्क पोलिसांचा पोरगा भ्रष्टाचार दाबण्यासाठी गुण्डागर्दी करित असुन या घटनेचा पत्रकारांनी निषेध व्यक्त केला असून अश्या मुजोर व भ्रष्टाचारी ठेकेदाराला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..