”रडारड करु नका, अधिवेशनात ऐतिहासिक..” संसदेत दाखल होण्यापूर्वी मोदी माध्यमांशी बोलले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- संसदेचं विशेष अधिवेशन आज सोमवारपासून सुरु होत आहे. संसदेच्या नवीन इमारतीमध्ये हे सत्र भरवण्यात येत असून संसदेत दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले की, भारताचा तिरंगा चंद्रावर अभिमानाने फडकत आहे. चांद्रमोहीम यशस्वी झाल्याने जगभरात भारताचा सन्मान वाढलाय. तसेच आपण जी २० परिषद यशस्वी करुन दाखवलेली आहे, त्यामुळे भारताचा गौरव होत आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारताच्या उज्ज्वल भविष्याचा काळ सुरु झाला आहे. काल विश्वकर्मा जयंती होती. देशातल्या विश्वकर्मा समूदायाचा जो परंपरागत व्यवसाय आहे तो त्यांना आधुनिक पद्धतीने करता यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. देशामध्ये उत्सवाचं वातावरण आहे, देशात नवीन आत्मविश्वास आपण अनुभव करत आहोत.
संसदेच्या विशेष सत्राबद्दल बोलताना मोदी म्हणाले, सत्र छोटं आहे परंतु वेळेच्या हिशोबाने मोठे निर्णय होणार आहेत. हे ऐतिहासिक निर्णयाचं सत्र असून नवे संकल्प, नवी ऊर्जा, नवा विश्वास यातून मिळणार आहे. त्यामुळे नेहमीची रडारड सोडून अधिवेशनात जास्तीत जास्त वेळ द्यावा, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.
ते पुढे म्हणाले की, वाईटपणा सोडून चांगुलपणाची कास धरत नवीन संसद भवनामध्ये प्रवेश करणं महत्त्वाचं आहे. उद्या गणेश चतुर्थीचं पावण पर्व सुरु होत आहे. नव्या भारताच्या स्वप्नांना आता बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..