‘माझा शब्द चुकला मी…’, ‘त्या’ वक्तव्यानंतर बच्चू कडू यांनी मागितली माफी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- प्रहारचे नेते मंत्री बच्चू कडू यांनी काल (रविवार) जळगाव येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दरम्यान चूक झाल्याचं लक्षात येताच आपला शब्द चुकला, असं म्हणत बच्चू कडू यांनी माफी मागितली आहे.
‘मी आमदार होणार नाही याची पर्वा नाही. परंतु शेतकऱ्याची पर्वा असणारा प्रहार पक्ष आहे,’ असं बच्चू कडू काल जळगावमध्ये बोलताना म्हणाले होते. यावेळी बोलत असताना त्यांनी एक वक्तव्य केलं होतं, आपण बोलताना केलेली चूक लक्षात येताच त्यांनी याबाबत माफी मागत त्यावर पडदा टाकला आहे.
जळगावमधील प्रहार जनशक्ती पक्षाच्याने आयोजित केलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी आपलं वक्तव्य सुधारत ‘आपल्याला आज-काल आंडू पांडू लोकही आमदार होतात असं आपल्याला म्हणायचं होतं,’ असं म्हटलं आहे.
भाषणातील बोलताना आपली चूक झाल्याचं लक्षात येताच. पत्रकारांशी बोलताना चुकीची कबुली देत बच्चू कडू यांनी भाषणात वापरलेल्या त्या शब्दाबद्दल माफी मागितली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..