उद्धव ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह पुन्हा मिळण्याची शक्यता…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? यावरुन आमनेसामने आहेत.
शिवसेना कुणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरु असलेल्या न्यायलयीन सुनावणीचा आज दुसरा टप्पा सुरू होणार आहे.हे. या सुनावणीदरम्यान न्यायालयात काय घडू शकतं याबाबत सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळण्याची शक्यता आहे असं सिद्धर्थ शिंदे म्हणाले.
आजच्या सुनावणीत कोर्टाचा कल समजणार
सिद्धार्थ शिंदे म्हणाले, सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या दोन सलग सुनावण्या आहेत. पहिली पक्ष आणि चिन्हांसंदर्भात याचिका आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी सोबतच विधानसभा अध्यक्षांविरोधातील याचिकेचीही सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीबाबत उशीर होत असल्यानं ठाकरे गटाची विधानसभा अध्यक्षांविरोधात याचिका आहे. आज सविस्तर सुनावणी होण्यची शक्यता कमी आहे. परंतु आजच्या सुनावणीत कोर्टाचा कल समजणार आहे. आजच्या सुनावणीनंतर कोर्टाची पुढील सुनावणी कधी होणार हे आजच्या सुनावणीत पुढील सुनवाणी कधी होणार या संदर्भात माहिती मिळणार आहे. परंतु आज पक्ष आणि चिन्ह अजूनही शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. तो निवडणूक आयोगाचा निर्णय होता. त्या निर्णयाविरोधात याचिका दाखल झाली आहे. निवडणूक आयोगाचा शिवसेनेबाबत जो निर्णय आहे तो घटनेच्या आधारे आहे का ते तपासले जाईल आणि त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल. मात्र तो निर्णय काय असेल हे आताच सांगता येणं कठीण आहे.
सुप्रीम कोर्ट काय करते? याची उत्सुकता महाराष्ट्राला
जेव्हापासून महाराष्ट्रात सत्तांतर झाले त्या दिवसापासून संपूर्ण राज्याची नजर ही सुप्रीम कोर्टाच्या घडामोडींकडे असते. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तरी अजूनही पुढचा भाग बाकी आहे. कारण विधानसभा अध्यक्षांकडे सुप्रीम कोर्टाने काही अधिकार सोपावले आहेत. त्यानंतर सुप्रीम कोर्ट काय करते? याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. विधानसभा अध्यक्ष सुनावणीला उशीर करतात त्यासंदर्भात ठाकरे गटाने याचिका दाखल केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीला सुरुवात केली आहे. एक दिवस देखील पार पडला आहे. याविषयी कोर्ट अध्यक्षांच्या कामकाजाविषयी काय टिप्पण्णी करते हे महत्त्वाचे आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..