मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाही…! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ओबीसींच्या आरक्षणात नवीन वाटेकरी येऊ देणार नाही, असे नमूद करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्रे दिली जाणार नसल्याचे शनिवारी स्पष्ट केले.
मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात देऊ नये, या मागणीसाठी सर्वशाखीय कुणबी, ओबीसी समाज कृती समितीतर्फे नागपुरातील संविधान चौकात सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. फडणवीस यांनी शनिवारी आंदोलनस्थळी भेट दिली. फडणवीस म्हणाले, ”ओबीसींचे आरक्षण कमी होऊ देणार नाही.
मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सरकारने दुरुस्ती याचिकेवर (क्युरेटिव्ह पिटीशन) काम सुरू केले आहे. मराठा आरक्षण रद्दबातल करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात सरकारने न्या. भोसले समिती स्थापन केली आहे. न्या. भोसले यांनी काही उपाययोजना सूचवल्या आहेत. त्या आधारावर मराठा आरक्षणासंदर्भात रद्द केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात ग्राह्य मानला जाऊ शकतो. त्यामुळे मराठा समाजाला जे वेगळे आरक्षण दिले होते ते पुन्हा कसे मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”
”मराठा समाजातील काहींच्या म्हणण्यानुसार, ते आधी कुणबी होते आणि नंतर त्यांना मराठा ठरवण्यात आले. या सगळय़ा बाबींची पडताळणी करण्यासाठी न्या. शिंदे समिती स्थापन करण्यात आली आहे. जरांगे-पाटील यांच्याकडून जे शिष्टमंडळ सरकारला भेटले त्यांनीही सरसकट असा शब्द टाकता येणार नाही, हे मान्य केले आहे. न्या. शिंदे समिती त्यासंदर्भातील अहवाल एका महिन्यात देणार आहे”, असेही फडणवीस म्हणाले.
मंत्रालयात आठवडाभरात बैठक
ओबीसींच्या मागण्यांबाबत आठवडाभरात मुंबईत राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि अन्य संघटनांची एकत्रित बैठक घेतली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..