“मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे-पाटलांना उपोषणास बसवलं, तर फडणवीसांनी.”, काँग्रेसचा गंभीर आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याासाठी जालन्यातील अमरावाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणास बसले होते. पण, सरकारने अटी मान्य केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जरांगे-पाटील यांनी १७ व्या दिवशी उपोषण सोडलं.
जरांगे-पाटील यांच्या उपोषणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.
“इंडिया आघाडीवरील बैठकीचं लक्ष वळवण्यासाठी जरांगे-पाटलांना उपोषणास बसवलं. त्यानंतर गृहमंत्र्यांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, “इंडिया आघाडीवरील लक्ष वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ३१ ऑगस्टला जरांगे-पाटलांना उपोषणास बसवलं होतं. त्यानंतर १ सप्टेंबरला ३ ते ४ च्या दरम्यान सौम्य लाठीचार्जचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. इंडिया आघाडीवरील लक्ष वळवण्याचं पार भाजपा आणि येड्याच्या सरकारनं केलं आहे.”
“पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले ‘बोलून मोकळं मोकळं व्हायचं’. हे फक्त दोन समाजात भांडण लावणार सरकार आहे. सौम्य लाठीचार्ज झाल्यावर फडणवीसांनी माफी मागितली. खरेतर फडणवीसांनी माफी नाहीतर राजीनामा द्यायला हवा होता. एकमेकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकारनं करू नये. ओबीसी आग आहे. ओबीसीत आल्यावर जाळल्याशिवाय सोडणार नाही,” असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….