राजस्थान मध्ये झाली नवीन जिल्ह्याची निर्मिती तर महाराष्ट्रात कधी होणार….? राजस्थान मध्ये नव्या जिल्ह्यांची झाली निर्मिती, विकासाला मिळेल चालना, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जयपूर :- राजस्थानमध्ये १९ नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या निर्णयाला पुर्णत्वास नेण्याबाबत संमती देण्यात आली.
या नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर राज्याच्या विकासाला चालना मिळेल. तसेच, सर्वसामान्य माणसांचे जीवनमान अधिक सुधारेल, असे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हाणाले.
नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे राज्याच्या विकासासंबंधीच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यात यश येईल. ज्यामुळे सर्वसामाण्य माणसापर्यंत सरकारी योजना, विविध सुविधा आणि सेवांचा लाभ लवकरात लवकर मिळेल. यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात सरकारी सुविधा पोहोचतील.
दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवण्यातही सरकारला यश येईल. दिवाणी न्यायालयातील प्रलंबित खटलेही यामुळे निकाली लागतील. त्यामुळे न्याय व्यवस्थेचे काम अधिक प्रभावीपणे सुरू राहील.
जिल्हांची निर्मिती झाल्याने सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासनातील नाते अधिक दृढ होईल. ज्यामुळे नागरिकांच्या समस्या जाणून समजून घेऊन त्यांचे निराकारण करणे प्रशासनाला सोपे जाईल. नव्या जिल्ह्यांची निर्मिती राज्य सरकार राबवत असलेल्या गुड गव्हर्नंसला अधिक चालना देण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडेल.
आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या बजेटमध्ये केलेल्या घोषणेनुसार राज्यात नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यासाठी सेवानिवृत्त आय.ए.एस अधिकारी रामलुभाया यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसारच आर्थिक वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प आणि विनियोग विधेयकावर चर्चा सुरू असताना राज्यात नवे १९ जिल्हे आणि ३ नवे विभागीय मुख्यालये करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली होती.
या नव्या जिल्ह्यांची घोषणा केल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यातून, जनसामान्य लोक तसेच सामाजिक संघटनांमधील काही लोकांची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यासाठी आली आहे. या प्रतिनिधींना नव्या जिल्ह्यांच्या सीमेसंदर्भात पुन: परिक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये १९ जिल्ह्यांची घोषणा करण्यात आली होती. या क्रमवारीनुसार विविध क्षेत्रातील लोकांच्या मागण्यांचे अर्ज या समितीला देण्यात आले. नियुक्त केलेल्या या उच्च स्तरीय समितीकडून या जिल्ह्यांचे पुन:परीक्षण करण्यात आले.
जिल्ह्यांचे परीक्षण केल्यानंतर समितीने अंतिम अहवाल २ ऑगस्ट २०२३ रोजी राज्य सरकारकडे सोपवला. या समितीच्या अहवालावरून ४ ऑगस्टला मंत्रीमंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीत १९ नवे जिल्हे आणि ३ नवे मुख्यालयांची निर्मिती करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
हे जिल्हे राज्यात नव्याने निर्माण झाले
अनुपगड
बालोतरा
ब्यावर
डीग
डीडवाना कुचामन
दूदू
गंगापुरसिटी
जयपूर (ग्रामिण)
कोटपूरती बहरोड
खेरथल तिजारा
नीम का थाना
फलौदी
सलूम्बर
सांचोर
शाहपुरा
नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी १८ जिल्ह्यांची पुर्नरचना करण्यात आलीय. यातील पुर्ननिर्मिती करण्यात आलेले जिल्हे खालीलप्रमाणे
अनुपगड – श्रीगंगानगर आणि बिकानेर जिल्ह्याला पुर्नरचना करून अनुपगड जिल्हा बनवण्यात आलाय. त्याचे मुख्यालय अनुपगड हेच आहे.
या जिल्ह्यातील उपविभाग आणि तहसिल कार्यालये कोणती असतील ते पाहुयात.
या नव्या १९ जिल्ह्यांमुळे राज्यातील जिल्ह्यांची संख्या तब्बल ५० झाली आहे.
नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीने राजस्थानातील जिल्ह्यांची संख्या ५० वर गेली आहे. डीडवाना कुचामन जिल्ह्यात सचिवालय भवन तयार होई पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचे कामकाज डीडवाना येथूनच सुरू राहील.
भिवाडी मुख्यालयात असलेले जिल्हास्तरीय कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा परिवहन विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र आह आहे त्याच जागी सुरू राहतील.
समितीने दिलेल्या आहवालानूसार जयपूरच्या विभागणीमध्ये सीकर, जोधपूरमध्ये पाली तर उदयपूरमध्ये बासवाडा हे तीन नवे उपविभाग तयार करण्याचे योजिले आहे.
जिल्हा आणि त्यांचे विभाग कोणते ते पाहुयात .
जयपूर – जयपूर, जयपूर (ग्रामिण), दूदू, कोटपूतली-बहरोड, दौसा, खैरथल, अलवर
सीकर- सीकर, झुंझनू, नीमचे ठाणे, चुरू
बीकानेर – बीकानेर, श्रीगंगानगर, हनुमानगड, अनूपगड
अजमेर- अजमेर, ब्यावर, केकडी, टोक, नागौर, डीडवाना-कुचामन, शाहपुरा
भरतपूर – भरतपूर, धौलपूर, करौली, डीग, गंगापुरसिटी, सवाईमाधोपुर
कोटा – कोटा, बून्दी, बारा, झालावाड
जोधपूर- जोधपूर, जोधपूर(ग्रामिण), फलौदी, जैसलमेर, बाडमेर, बालोतरा
पाली- पाली, जालौर, सांचौर, सिरोही
उदयपूर – उदयपूर, चित्तोडगड, भीलवाडा, राजसमंद, सलूंबर
बसवाडा – बासवाडा, डूंगरपूर, प्रतापगड

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….