निवडणुकांमध्ये पैसे वाटल्यास एक वर्षांची शिक्षा ; अमित शाहांनी आणलेली तीन विधेयकं कोणती…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सभागृहात तीन विधेयकं मांडली. जुन्या ब्रिटिशकाली कायद्यात बदल आणि राजद्रोहाचं कलम वगळण्यासंबंधी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
ही विधेयकं स्टँडिंग कमिटीकडे चर्चेसाठी पाठवण्यात आलेली आहेत.
आयपीसी, सीआरपीसी आणि इंडियन एव्हिडन्स अॅक्ट या तीन कायद्यातील बदलांसंदर्भात विधेयक आणण्यात आलेलं आहे. या विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. आज लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयकं मांडली आहेत.
कायद्यामधील ब्रिटिशकाली तरतुदी वगळण्यासंदर्भात मागील चार वर्षांपासून चर्चा सुरु होत्या. अखेर आज अमित शाह यांनी यासंबंधीचं विधेयक मांडलं. यामध्ये १२४ अ हे राजद्रोहाचं कलम नव्या तरतुदींमध्ये वगळ्यात आलेलं आहे. तर नवीन भादंवीमध्ये सेक्शन १५० महत्त्वाचं ठरणार आहे. नवीन विधेयकामध्ये विघटनवादी शक्तींना रोखण्यासाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
यासह लहान मुलांच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेची तरदूत वाढवण्यात आलेली आहे. यात पूर्ण माफी मिळणार नसून शिक्षा कमी होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे निवडणुकांमध्ये पैसा वाटणं गुन्हा ठरवण्यात येणार आहे.
विधेयकामध्ये पैसा वाटण्याच्या गुन्ह्यामध्ये एक वर्षाची तरतूद करण्यात आलेली आहे. कायदा हा शिक्षा देण्यासाठी नसावा तर न्याय देण्यासाठी असावा, असं लोकसभेत बोलतांना अमित शाह यांनी सांगितलं. पुढे हे विधेयक स्टँडिंग कमिटीकडे चर्चेसाठी पाठवण्यात आलेलं आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….