“शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही, कारण.”, नरेंद्र मोदींचं वक्तव्य….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित होते.
शरद पवार या सोहळ्याला उपस्थित राहिल्याने विरोधी पक्षांमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अशातच नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
“काँग्रेसमुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही,” असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील ( एनडीए ) खासदारांशी मोदींनी संवाद साधला. तेव्हा मोदींनी हे विधान केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही. तसेच, शरद पवार आणि काँग्रेसने अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डालवण्यांचं काम केलं.”
“सत्तेत असताना चुकीची कामे करणाऱ्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. नंतर निवडणूक प्रचारावेळी या नेत्यांनी केलेल्या चुकांची माफीही मागितली. काँग्रेसप्रमाणे भाजपा अहंकारी नाही. २०२४ होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा विजय होणार,” असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..