बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, CM शिंदेंच्या भेटीनंतर निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईतील परिवहन सेवा बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर सात दिवसांनी मागे घेण्यात आला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
या भेटीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी सांगितलं. कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेस्टच्या पेरोलवर घेणं, पगारवाढ या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिल्याचं संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितलं. शिंदे यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
आम्हाला बेस्टच्या सेवेत कायम करून घ्या, ‘समान काम समान वेतन’ या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप सुरू राहणार, असा पवित्रा संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतला होता. सहा दिवसांपासून कंत्राटी कामगारांचा संप सुरू होता. या आंदोलनाला संघर्ष कामगार कर्मचारी युनियननेही पाठिंबा दिला होता. सोमवारी दादर येथे मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार, असे युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले होते.
तोडग्यासाठी पालकमंत्र्यांची मध्यस्थी
मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संपात मध्यस्थी केली. २४ ते ४८ तासांत हा संप मिटेल, अशी ग्वाही दिली होती. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे सांगत लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर येण्याचे आवाहन लोढा यांनी केले होते. मुंबईकरांना या संपामुळे त्रास झाल्याचेही त्यांनी मान्य केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..