आगामी निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांचे भाकित, ट्विटद्वारे दिली संकटांची माहिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पुढच्यावर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. आतापासूनच या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी एकत्र येत INDIA आघाडी स्थापन केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखणं हे देशातील सर्व विरोधी पक्षांसमोर लक्ष्य आहे.
यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे आपला निवडणूकपूर्व अंदाज व्यक्त केला आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जशा-जशा जवळ येतील तसे देशातील दलित आणि आदिवासी यांच्या विरोधातील अत्याचारात तसेच ओबीसी, मुस्लिम आणि महिला यांच्यावरील हिंसाचारात लक्षणीय वाढ होणार, असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापारातील सगळ्यात मोठ्या ठेकेदाराच्या ‘प्ले बुक’ मधून लिंचिंग, द्वेषयुक्त भाषणे, सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवणे, दंगली – हे आणि असे बरेच काही निवडले जाईल आणि भाजप-आरएसएसच्या गुंडांच्या मार्फत ते राबवले जाईल.’ असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

ट्विटमध्ये पुढे त्यांनी भाजप-RSS ची योजना भारतीय प्रजासत्ताकला निवडणुकीतल्या फायद्यासाठी ‘भयभीत प्रजासत्ताक’ मध्ये रूपांतरित करण्याची असल्याचे म्हटले आहे. तसेच यादरम्यान काँग्रेस तटस्थ भूमिका घेईल आणि ‘मोहब्बत की दुकान’चे तुणतुणे वाजवत राहील असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (४ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. आंबेडकर म्हणाले, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांना राष्ट्रीय पक्षांची गरज उरलेली नाही.
हा बदलेला राजकीय पट ‘इंडिया’ व्यासपीठ विचारात घेणार आहे का? ‘इंडिया’ व्यासपीठाबाहेरचे पक्ष आपआपल्या राज्यात बळकट आहेत. ते आपल्या राज्याचा विकास करू शकतात. इंडिया आघाडीने मणिपूर प्रश्न गंभीरपणे मांडला नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..