महाराष्ट्रातील ४४ जुनी स्थानके चकाकणार..! देशातील ५०८ स्थानकांचा समावेश…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी देशातील ५०८ जुन्या रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचा एकाच वेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रारंभ करणार आहेत. यात महाराष्ट्रातील ४४ जुन्या स्थानकांचा समावेश केला आहे.
त्यांचा पुनर्विकास करून तेथे सिटी सेंटर व शॉपिंग मॉल विकसित केला जाणार आहे.
रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचा एकाच वेळी प्रारंभ करीत असताना संबंधित लोकसभा मतदारसंघातील खासदार व केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या भागांतील रेल्वेस्थानकांवर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकाच वेळी एवढ्या रेल्वेस्थानकांवर हा कार्यक्रम आयोजित करून नवीन रेकॉर्ड केले जात आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनातील कक्षात भेट घेतली. वैष्णव यांनी सांगितले की, ५०८ रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासासाठी २४४७० कोटींची तरतूद केली आहे.
‘अमृत भारत स्थानक’ योजनेंतर्गत देशातील १३०९ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे स्थानकावर शॉपिंग सेंटर, सिटी सेंटर…
– या रेल्वेस्थानकांवर पुनर्विकासांतर्गत शॉपिंग सेंटर, शॉपिंग मॉल्स, सिटी सेंटर उभारण्यात येतील. रेस्टॉरंट, दुकाने, शोरूम, जिम्नॅशियमसुद्धा येथे असतील.
– पुनर्विकासासाठी महाराष्ट्रातील ४४ रेल्वेस्थानकांची निवड करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील ५५, राजस्थानमधील ५५, बिहारधील ४९, मध्य प्रदेशातील ३४, आसाममधील ३२, ओडिशामधील २५, पंजाबमधील २२, गुजरातमधील २१, झारखंडमधील २०, आंध्र प्रदेशातील १८, हरयाणातील १५ व कर्नाटकमधील १३ रेल्वेस्थानकांची निवड करण्यात आली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..