खळबळजनक…! सैन्यातून फरार झालेला मेजर ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा फरार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपुर :- पंजाबमध्ये कर्तव्यावर असताना अचानक फरार झालेल्या मेजरला सैन्य अधिकाऱ्यांनी सापळा रचून ताब्यात घेतले होते. सैन्याच्या ताब्यातून त्या मेजरने दोन दिवसातच पुन्हा पळ काढला.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी कामठी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
मेजर राजीव धालसिंह बोपचे (३५, सिवनी, मध्यप्रदेश) असे संबंधित फरारी अधिकाऱ्याचे नाव आहे.
बोपचेची पंजाब येथील भटिंडा येथे पोस्टिंग होती व फेब्रुवारी २०२० मध्ये सैन्याकडून बोपचेला फरार घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता व त्याच्याविरोधात ‘लूक आऊट नोटीस’ जारी करण्यात आली होती. २९ जुलैला इमिग्रेशन विभागाने बोपचेला विमानतळावरून ताब्यात घेतले व त्यानंतर त्याला सोनेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाला सोपविले. पोलिसांनी याची सूचना गार्ड्स रेजिमेंटल सेंटरला दिली होती. तेथील अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी सायंकाळी त्याचा ताबा घेतला व त्याला सेंटरमधील ऑफिसर्स मेसमध्ये ठेवण्यात आले होते. ३० जुलैला त्याला भेटण्यासाठी त्याची आई व भाऊ संदेश हे आले होते.
ते सायंकाळी परतल्यानंतर बोपचे त्याच्या खोलीतच होता व बाहेर सैनिक पहारा होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो बाथरूममध्ये गेला व तेथील ग्रिल तोडून त्याने पळ काढला. सैन्याकडून फरार झालेला मेजर ताब्यात घेतल्यानंतर परत फरार झाल्याने खळबळ उडाली. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जुनी कामठी पोलीस ठाण्यात बोपचेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..