“राज्याचे गृहखाते सक्षम नसल्याने.”; सुप्रिया सुळेंची गृहमंत्र्यांवर खोचक टीका…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आज विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. आज सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत भाष्य केलं आहे.
महाराष्ट्रात गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अशात जळगाव जिल्ह्यातुन धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत दिली आहे. या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.
ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून करुन तिचा मृतदेह जनावरांच्या चाऱ्यात लपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ही घटना अतिशय संतापजनक असून, याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करुन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
राज्याचे गृहखाते सक्षम नसल्याने राज्यात गुन्हेगार मोकाट असून महिला सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.”

दरम्यान, आज सभागृहात बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “अनेक कारणांमुळे महिला गायब होतात.
यामध्ये काही महिला पळून गेलेल्या असतात तर काही घर सोडून निघून जातात. तर काही महिला आणि मुली हरवलेल्या असतात. यांना आपण दोन कॅटेगरीमध्ये विभागू शकतो.
एक म्हणजे 18 वर्षाखालील आणि दुसरी म्हणजे 18 वर्षावरील. 2021 मध्ये आतापर्यंतच्या महिला आणि मुली गायब झाल्या होत्या, आतापर्यंत त्यांच्यातील 87 टक्के महिला सापडल्या आहे.
तर 2022 मध्ये ही संख्या 80% वर जाऊन पोहोचली आहे. जानेवारी 2023 ते 2023 दरम्यान घडलेल्या घटनांमधील 83 टक्के घटना सोडवण्यात आल्या आहे. हा आकडा लवकरच 90% पर्यंत पोहोचणार आहे.”

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..