भ्रष्टाचारावर तडजोड होणार नाही ; कर्नाटकमधील मंत्र्यांसोबतच्या बैठकीत राहुल गांधींची भूमिका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला. पक्षाच्या वतीने राज्याच्या स्थितीबाबत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधीही सहभागी झाले होते.
भ्रष्टाचाराच्या विरोधातच विजय झाला असल्याने नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप टाळावेत, असं राहुल गांधी यांनी राज्य सरकारच्या मंत्र्यांना सूचित केले.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. जनतेला दिलेली आश्वासने कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायची, अशाही सूचना त्यांनी दिल्या. तसेच 2024 च्या विजयासाठी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली जाईल, ज्या भागात जबाबदारी देण्यात आली आहे, त्याच्यावर त्या भागातील विजयी कामगिरीची जबाबदारी असेल, असही स्पष्ट करण्यात आलं.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, 2024 मध्येही कर्नाटकच्या यशाची पुनरावृत्ती करावी लागेल. शिवाय खरगे यांनी ट्विट केले की, आम्ही ६.५ कोटी कन्नडिगांसाठी प्रगती आणि कल्याणाचा नवा अध्याय लिहित आहोत. आम्ही आमच्या ५ आश्वासनांच्या पूर्ततेसाठी अथक प्रयत्न करत आहोत.
एक ऐतिहासिक जनादेश, आपल्यासोबत एक मोठी जबाबदारीही घेऊन येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील लोकही काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवतील असा आम्हाला विश्वास असल्याचं खरगेंनी नमूद केलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..