संभाजी भिडेंना ८ दिवसांत पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- अमरावती येथे २७ जुलै रोजी येथील महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
शिवाय वादग्रस्त विधानांबाबत राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे व आयोजकांना नोटीस जारी केली आहे.
संभाजी भिडे यांना ८ दिवसात अमरावती पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. आता ८ दिवसात संभाजी भिडे अमरावती पोलिसांकडे हजर राहतात का? हे पाहावं लागणार आहे. याच संदर्भात राज्यात ज्या ठिकाणी भिडेंवर गुन्हे दाखल झाला, त्या ठिकाणचे गुन्हे अमरावतीत वर्ग करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे.
संभाजी भिडे यांनी २७ जुलै रोजी सायंकाळी ६ ते १० या कालावधीत एका मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. त्या दरम्यान, त्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करून व लोकांमध्ये असंतोष पसरवून विविध समाजघटकांमध्ये वाद वाढविण्याचे भाष्य केले. तथा महापुरुषांची बदनामी केली.
या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे (रा. सांगली), निशांतसिंह जोध, अविनाश मरकल्ले व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संभाजी भिडे यांना नोटीस जारी करण्यात आल्याचं पोलिस प्रशासनाने सांगितलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..