काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मराठवाड्याकडे जाण्याची शक्यता….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेसने विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी विदर्भातील विजय वडेट्टीवार यांची निवड केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाबरोबर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदही विदर्भातील दुसर्या ओबीसी नेत्यांकडे देण्यात आले आहे.
यामुळे पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आले असून प्रदेशाध्यक्षपद हे मराठवाड्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याकडे जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार चुरस होती. यामध्ये संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विजय वडेट्टीवार यांच्याकडे या पदाची धुरा दिली आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि प्रदेशाध्यक्षपद ही दोन्ही पदे काँग्रेसने विदर्भाला दिली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद हे मराठवाड्याला देण्याची पक्षश्रेष्ठींनी आखणी केली आहे. वडेट्टीवार हे ओबीसी नेते असून त्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या होत्या. पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यात यावे, अशी त्यांची मागणी होती. त्यांनाच विरोधी पक्षनेतेपद दिल्याने पटोले यांच्या गोटात अस्वस्थता आहे.
वडेट्टीवार यांची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिफारस केली होती. प्रदेशाध्यक्षपदावरून पटोले यांची उचलबांगडी करण्यासाठी काँग्रेसमधील सर्व गट कामाला लागले आहेत. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह विदर्भातील काँग्रेसचे अनेक आमदार पटोले यांच्या विरोधात आहेत.
पटोले यांचा स्वभाव आक्रमक आहे. त्यांच्या वक्तव्यावरून अनेक वादही निर्माण झाले. पक्षपाती काँग्रेस प्रभारी राज्यात पाठवू नका, असे पटोले यांनी काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांना सांगितले होते. त्यामुळे खर्गे पटोले यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद जाईल, असे ठामपणे काँग्रेसचे नेते सांगत आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..