जिल्हा बँकेचे अध्यक्ष कोंगरे यांचा राजीनामा ; नवीन अध्यक्ष कोण..? याकडे जिल्ह्याचे लक्ष ; जिल्ह्याचे राजकारण तापणार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- मागील सहा महिन्यापासून जिल्हा बँकेत अध्यक्षपदावरून राजकारण तापले होते अखेर जिल्हा बँकेचे अध्यक्ष काँग्रेस चे टिकाराम कोंगरे यांनी आज आपला राजीनामा दिल्यामुळे पुढील अध्यक्ष कोण? हा सवाल निर्माण झाला आहे. अध्यक्षांनी राजीनामा दिला नसता तर इतर संचालकाकडून अविश्वास आणण्याच्या हालचाली सुरू होत्या परंतु अध्यक्षांनी स्वतः राजीनामा दिल्यामुळे ज्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा बँकेत संख्याबळ बघितले असता काँग्रेसचे नऊ शरद पवार राष्ट्रवादी दोन,अजित पवार राष्ट्रवादी दोन,ठाकरे शिवसेना एक, शिंदे शिवसेना तीन, भाजपा दोन तर अपक्ष दोन असे संख्याबळ आहे.

सर्वाधिक संख्या काँग्रेसची असल्यामुळे अध्यक्ष पदावर निश्चितच काँग्रेसचा दावा असणार आहे परंतु इतरही संचालक ऐन वेळेवर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा बँक जिल्ह्यातील राजकारणातील मोठे सत्ता केंद्र आहे. हे सत्ता केंद्र आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्षाकडून प्रयत्न होणार आहेत. स्व. खासदार बाळासाहेब धानोरकर यांचे निधन झाल्यामुळे टिकाराम कोनरे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव होता . जिल्हा बँक ही शेतकऱ्याला कर्ज देण्यास असमर्थता दर्शवीत असून आता होणाऱ्या मात्र अध्यक्षाच्या निवडीमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..