संभाजी भिडेंच्या औरंगाबादमधील उद्याच्या कार्यक्रमाची पोलिसांनी परवानगी नाकारली; कॉंग्रेसकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- मागील काही दिवसांत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. तर जागोजागी त्यांच्या कार्यक्रमांना विरोध होतांना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, उद्या (1 ऑगस्ट) रोजी संभाजी भिडे यांचा औरंगाबाद (Aurangabad) शहरात कार्यक्रम होणार असून, यासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी भिडे यांच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत औरंगाबाद शहर पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.
औरंगाबाद शहरात उद्या पाच वाजता कॅनॉट परिसरातील अग्रेसन भवन येथे संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, आयोजकांना पोलिसांनी लेखी पत्र देऊन परवानगी नाकारली आहे. काँग्रेससह इतर संघटनांनी उद्या होणारा भिडे गुरुजींचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र पोलिसांनी आयोजकांना पाठवले आहे.
महाविकास आघाडीकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा…
आपल्या वादग्रस्त वक्तव्याने सध्या चर्चेत असलेले भिडे गुरुजी हे उद्या औरंगाबाद शहरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांची भेट घेत घेत, निवेदन देत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच शहरातील त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नयेत अशी मागणी केली आहे. जर भिडे गुरुजींच्या उद्याच्या शहरातील कार्यक्रमाला परवानगी दिली तर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या वतीने तो कार्यक्रम हाणून पाडतील असा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच जर उद्या भिडे गुरुजी शहरात आलेच, तर ते परत कसे जातील हे बघूच असा इशारा देखील शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. या शिष्टमंडळामध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
राज्यभरात संतापाचे वातावरण…
मागील काही दिवसांत संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य सतत समोर येत आहे. तर भिडे यांनी महापुरुषांबद्दल देखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तर महात्मा गांधी यांच्याबद्दल सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राज्यभरात भिडे यांच्याविरोधात संतापाचे वातावरण आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..