गुलाम नबी आझाद शाळेच्या मुख्य गेट जवळ घाणीचे साम्राज्य ; विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद विधान परिषद सदस्य, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष व अल्पसंख्याक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा यांची वसंत नगर मध्ये गुलाम नबी आझाद शैक्षणिक संकुल आहे.
तिथे वर्ग पहिली ते वर्ग बारावीपर्यंत आणि बी.एस. डब्ल्यू,एम.एस.डब्ल्यू, डी. एड, बी.एड पर्यंत अभ्यासक्रम सुरू आहे. या अल्पसंख्याक संस्थांचे शैक्षणिक संकुल मध्ये तीन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शैक्षणिक संकुल मध्ये विद्यार्थी यांना येण्या जाण्या करिता एकमेव प्रवेशद्वार आहे. या प्रवेश द्वारा समोर खूप कचरा होत आहे. या कचऱ्यामुळे बरेच विद्यार्थी यांना जीवावर धोका निर्माण झाला आहे. या कचरा मधून खूप दुर्गंध निर्माण होत आहे. तसेच या कचऱ्यामुळे कुत्रे व इतर जानवर येथे राहत आहे. त्यामुळे लहान मुले व मुली यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद चे जिल्हाध्यक्ष ॲड.मिर्झा आदिल बेग व जिल्हा महासचिव फिरोज खान यांनी मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. दररोज साफ सफाई करण्यात यावी तसेच एक मोठी कचराकुंडी प्रवेशद्वार समोर ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच टिपू सुलतान चौक, नवीन शादी खाना व व इतर ठिकाणी कचराकुंडी ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..