ओबीसींसाठी लोकसभा, विधानसभेत स्वतंत्र मतदार संघ करा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन महती ऑडिटोरियम बालाजी कॉलनी, तिरूपती, आंध्र प्रदेश येथे ७ ऑगस्टला आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी केंद्र सरकारकडे ओबीसींसाठी लोकसभा, विधानसभेत स्वतंत्र मतदार संघासह एकूण ४२ मागण्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली.
प्रेस क्लबमध्ये शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तायवाडे म्हणाले, अनुसूचित जाती, जनजातीच्या धर्तीवर ओबीसींनाही राज्यातील सर्वच शाखांमध्ये आरक्षण द्या, जातनिहाय ओबीसींची जनगनना करा, ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसकल्पात तरतुद करा, जुनी पेन्शन तात्काळ लागू करा, सर्वोच्च न्यायालयाने घातलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा दूर करण्यासाठी घटनादुरूस्ती करा, ओबीसींच्या मुले- मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह करा, ओबीसी शेतकऱ्यांना वयाची साठी ओलांडल्यावर पेंशन लागू करा याइतरही ४२ मागण्या आम्ही करणार आहोत. ओबीसी महासंघ तयार झाल्यापासून केंद्र व राज्य शासनाने तब्बल ३३ वेगवेगळे शासन निर्णय घेतले. याही मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्यस्तरावर प्रसंगी आंदोलन केले जाईल, असेही डॉ. तायवाडे म्हणाले.
ओबीसींसाठी आता स्वतंत्र गृहनिर्माण योजना सुरू होणार असून त्यातून १० लाख कुटुंबांना घरे मिळणार असल्याचेही त्यानी सांगितले. ओबीसींच्या तिरूपतीतील अधिवेशनाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्यासह देश- विदेशातील ओबीसींचे मोठे नेते, विविध पक्षातील पदाधिकारी व विविध क्षेत्रातील महत्वाची व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला महासंघाचे सचिन राजूरकर, शरद वानखेडे, गुनेश्वर आरीकर, परमेश्वर राऊत, ऋषभ राऊत, सुषमा भड, रेखा बाराहाते उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..