भाजप म्हणजे भ्रष्ट जनता पक्ष..! ठाण्यातील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचा घणाघात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ठाणे :- दुसरीकडे असेल तर तो मळ आणि तुमच्याकडे आला तर तो कमळ, असा टोला लगावत भ्रष्टाचाऱ्यांची बुलेट ट्रेन सुसाट घेऊन जाणारा भाजप आता भ्रष्ट जनता पक्ष झाला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात केली.
विश्वगुरू, महाशक्तीचा प्रमुख अशा नेत्याच्या राजवटीत मणिपुरमध्ये महिलांची अब्रु लुटली जात आहे असे ठाकरे यांनी नमूद करत, देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत. त्यांना काही संवेदना आहेत की नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
येथील गडकरी रंगायतन नाटय़गृहामध्ये पक्षाच्यावतीने हिंदी भाषी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. राम मंदिरासाठी कायदा करा असे आम्ही सांगितले होते. राम मंदिरासाठी कायदा केला नाही. पण, लोकशाही संपविण्यासाठी कायदा करीत आहेत असा आरोप केला. मी मोदी किंवा कोणत्या व्यक्तीविरोधात नाही. मी हुकूमशाहीच्या विरोधात नक्की आहे.
आधी भारतात बाहेरच्या देशातून मुघल यायचे. बाबरही बाहेरच्या देशातून आला होता. त्यामुळेच तर आपण बाबरी मशीद पाडली. त्यानंतर इंग्रज आले. इंग्रजांशी लढताना आपल्या अनेक पिढय़ा मरण पावल्या. पण आपण लढत राहिलो. शेवटी इंग्रजांनाही आपला देश सोडून जाव लागले. आता आपल्या घरातलेच आपल्या डोक्यावर बसू पाहत आहेत. २०२४ ची संधी हुकली तर रेल्वे सुटली असेच समजावे लागेल. त्यानंतर आपला देश आपल्या हातून निसटून जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..