यवतमाळ जिल्हा भाजपाचे समन्वयक नितीनजी भुतडा यांनी दिली धनोडा येथील पूरग्रस्तांना भेट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अनिल बोम्पीलवार
हिवरा संगम :- आम्ही सुद्धा माणसंच आहोत या आशयाची पॉलिटिक्स स्पेशल च्या बातमीची दखल घेऊन कर्तव्यदक्षतेसाठी प्रसिद्ध असलेलेयवतमाळ जिल्हा भाजपाचे समन्वयक नितीन भुतडा यांनी धनोडा येथील पूरग्रस्तांना भेट देऊन त्यांना दिलासा दिला आहे. व संबंधित अधिकाऱ्यां सोबत चर्चा करून सदर नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर योग्य ती मदत व सानूग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी त्यांच्या समवेत हिवरा येथील सामाजिक कार्यकर्ते अभय बोम्पीलवार , धनोडा येथील सरपंच उज्वला भारती, येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जयस्वाल, स्वप्निल गावंडे आदी उपस्थित होते. दिनांक 21 च्या ढगफुटी सदृश्य पावसामुळेअनंतवाडीच्या बेटाप्रमाणेच धनोडा येथील जुन्या गावाला पैनगंगेच्या पुराने विळखा घातला होता 15 घरांची वस्ती असून अनेक अनेकांनी रात्री आलेल्या महाभयंकर पावसानंतर आपले घरदार अन्नधान्य सामान सोडून तिथून जीवाच्या आकांताने ते ठिकाण सोडले. पण तिथे 25 नागरिक अडकून पडले होते या लोकांची एचडी आर एफ च्या टीमने बोटीच्या सहाय्याने सुटका केली पण दुसऱ्या दिवशी येथील परिस्थिती अतिशय बिकट होती घरामध्ये दोन ते तीन फूट गाळ चिखल साचला होता. घरातील बरेचसे साहित्य भांडीकुंडी अन्नधान्य अक्षरशः मुलांची खेळणी शालेय साहित्य वह्या पुस्तके वाहून गेले होते. पूर ओसरल्यानंतर पाच दिवसानंतर सुद्धा येथील पूरग्रस्ताकडे कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेने ढुंकूनही पाहिले नाही. शेतकरी व्यापारी असलेले येथील संजय अराडे यांचा दहा क्विंटल कापूस अक्षरशः सडून गेला आहे. तर लक्ष्मण दत्तात्रय अराडे यांच्या हॉटेलमधील सर्व साहित्य वाहून गेले आहे. त्याच प्रकारे प्रवीण जयस्वाल यांच्या किराणा दुकानातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वस्तीतील निर्मला बाई जयस्वाल, शेख इमाम शेख कालू, उस्मान पठाण, संभाजी आन्ने, नूर शेख ,अमोल अन्ने, मदन राठोड, नंदनवार महाराज, राजू अन्ने, जाकीर कुरेशी, वामनराव चव्हाण आदी लोकांचे सुद्धा घर साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

“पॉलिटिक्स स्पेशल” चा पोर्टलच्या बातमीची दखल….
या सर्व नुकसानीची छायाचित्रासह “पॉलिटिक्स स्पेशल” चा पोर्टलवर बातमी प्रकाशित होतात या बातमीची भाजपाचे यवतमाळ जिल्हा समन्वय नितीनजी भुतडा यांनी दखल घेऊन उपविभागीय अधिकारी काळबांडे यांच्यासोबत चर्चा केली. उपविभागीय अधिकारी यांनी लगेच तलाठ्यांना सूचना देऊन तेथील नुकसानीचे पंचनामे केले असून स्वतः उपविभागीय अधिकारी यांनी या नुकसानग्रस्त भागाला भेट दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..