संभाजी भिडेचा काँग्रेसकडून राज्यभर निषेध ; राज्य शासनाने कारवाई करण्याची मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. महात्मा गांधी चौकात झालेल्या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भिडे यांचा जाहीर निषेध केला.
अमरावती जिल्ह्यात बडनेरा येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये केले. हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सर्वधर्मसमभाव ही आपल्या देशाची ओळख असून ती पुसण्यासाठी काही लोक प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष स्वाती जाधव, अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. फारूख शेख, पृथ्वीराज सिरसाट, विद्याताई पाटील, जमालोद्दीन मणियार, तबरेज तांबाेळी, ॲड. देवीदास बोरूळे, बिभीषण सांगवीकर, कुणाल येळीकर, अकबर माडजे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..