१६ आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वात मोठी बातमी ; राहुल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील ४० आमदारांना दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.
काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या ४० आमदारांसह ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस पाठवली होती. या नोटीसीवर दोन आठवड्यात असे निर्देश राहुल नार्वेकर यांनी दिले होते.
दरम्यान, ठाकरे गटाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या नोटीसीला वेळेवर उत्तर दिले. मात्र, शिंदे गटातील आमदारांनी विधीमंडळ कामकाज सुरु असल्याने मुदतवाढ मिळावी अशी राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती.
त्यामुळे या आमदारांना नोटीसीला उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटातील आमदारांना दोन आठवड्याची मुदत दिली आहे. नुकतीच विधानसभा अध्यक्ष, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची यासंदर्भात आढावा बैठक पार पडली होती. या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आता आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी आणखी दोन आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच निकाल दिला आहे. तसेच आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी रिजनेबल टाईमध्ये घ्यावा असे देखील सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेत विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवरकर निर्णय घेण्याचे निर्देश देण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने अध्यक्षांना नोटीस पाठवून या प्रकरणात काय कारवाई केली याचे उत्तर मागितले होते. यासाठी कोर्टाने अध्यक्षांना दोन आठवड्याची मुदत दिली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..