हिंसाचारादरम्यान गोळीबार करणारा आरोपी मोहम्मद शाहरुखला पोलिसांनी केली अटक
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
वृत्तसंस्था – उत्तर/पूर्व दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान गोळीबार करणारा आरोपी मोहम्मद शाहरुखला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिस आणि क्राइम ब्रांचने आज(मंगळवार) शाहरुखला उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून ताब्यात घेतले. शाहरुखने 24 फेब्रुवारीला जाफराबादमध्ये पोलिस जवानांनावर बंदुक रोखली होती आणि 8 राउंड फायर केले होते. मागील 8 दिवसांपासून तो फरार होता.
यापूर्वी क्राइम ब्रांचला शाहरुख बरेलीमध्ये लपला असल्याची माहिती मिळाली होती. यावर दिल्ली पोलिस आणि क्राइम ब्रांचची 10 पथके त्याचा शोध घेत होती. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, शाहरुख फायरिंगनंतर पानीपत, कैराना, अमरोहा अशा अनेक शहरात लपत होता. अखेर त्याला बरेलीमधून अटक करण्यात आली.

वाचकाचे अमाप प्रेम व शासनाच्या सहकार्याने “पॉलिटिक्स स्पेशल” शासकीय यादीवर
सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..