‘अजितदादा बोलतात गोड पण कार्यक्रम सुरू असतो’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस सुरू आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोलीस भरती, बारावी परीक्षेतील पेपरफुटीवर प्रश्न उपस्थित केले.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली.
‘अजितदादा तुम्ही गोड बोलता पण तुमचा कार्यक्रम सुरू असतो. अशी पोटदु:खी सुरू राहुदे, यासाठी आम्ही जालीम औषध ठेवले आहे. यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना लगावला.
यावेळी अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी जोरदार टोले लगावले. “सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून आम्हाला धक्का बसला राज्यपाल कोश्यारीही अवाक झाले असंही अजितदादा भाषणात म्हणाले. पण, तुम्ही २०१९ मध्ये साखर झोपत शपथ घेतली. मी तेव्हा सकाळी टीव्ही लावली तेव्हा धक्का बसला. तो खरा आमच्यासाठी मोठा शॉक होता त्यातील अनेक कथा देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितल्या आहेत, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अजित पवार यांना लगावला.
“तुम्ही आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणता मग तुम्हीही घटनाबाह्य विरोधी पक्षनेता आहात का?, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला. अजितदादा आता शिवसेनेचे प्रवक्तेही झाले आहेत. कडवट कट्टर तुम्ही बनू नका, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. (Maharashtra Budget 2023)
एकदा ठरवा मुख्यमंत्री कोण होणार
काही दिवसापूर्वी मुंबईसह पुण्यात बावी मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लावले होते, हे बॅनर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जयंत पाटील यांचे लावले होते, यावरुनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात टोले लगावले. “जयंत पाटील आणि अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लावले आहेत, ते अगोदर ठरवा कोण होणार मुख्यमंत्री. सगळ्या बॅनरची साईज सेमच आहे, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….