ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पिंपरी चिंचवड :- चिंचवड विधानसभा पोटनिडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा प्रचार करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.
ही घटना डांगे चौक मंगलनगर येथे सायंकाळी घडली. भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शहरात रोड शो सुरू असतानाच ही घटना घडली.
महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा शहरप्रमुख सचिन भोसले, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेरगाव परिसरात घरोघरी जात प्रचार करत होते. प्रचारादरम्यान सायंकाळी काहीजण तेथे आले. त्यांनी भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. त्यात भोसले यांच्या हाताला दुखापत झाली आहे. तर, राष्ट्रवादीचे कार्यकर्ता गोरख पाषणकर याचा पाय मोडला असल्याचे सांगण्यात आले.
दोघांनाही उपचारासाठी बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा हल्ला कोणी केला आणि नेमका कशासाठी केला हे अद्याप समोर आले नाही.
आम्ही प्रचार करत होतो, आम्हाला थेट येऊन मारहाण केली – भोसले
चार ते पाच जणांनी हल्ला करून मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व भाजपाचे कार्यकर्ते आहेत. ज्याने मारहाण केली तो गुंड आहे. आज सुदैवाने बचवलो. वरिष्ठ नेत्यांना याबाबत कळवले आहे. आम्ही प्रचार करत होतो, आम्हाला थेट येऊन मारहाण केली. वैयक्तिक माझे वाद नाहीत. यापूर्वी माझ्या विरोधात भाजपाचा उमेदवार लढला होता, हे त्यांचे कार्यकर्ते आहेत. नियोजन करून मला मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करून हल्ला केला, असे सचिन भोसले म्हणाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….