टेन्शन वाढलं….! ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार, आता…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत ही 23 जानेवारीला संपणार आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची 5 वर्षे पूर्ण होत आहेत. याच तारखेला त्यांची संघटनात्मक प्रमुख पदाची मुदत संपत आहे.
तर या संघटनात्मक निवडणुकांसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे.
एकीकडे निवडणूक आयोगासमोर पक्षाची कायदेशीर लढाई सुरू आहे. तर दुसरीकडे या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपत आहे. 23 जानेवारी 2018 मध्ये कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदाची निवड झाली होती. ही निवड 5 वर्षांसाठी असते. ही मुदत 23 जानेवारी 2023 ला संपत आहे. याच पार्श्वभूमीवर संघटनात्मक प्रमुख निवणुकीसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे. निवडणूक आयोग य=यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.
पक्षप्रमुख पदाबाबतच्या चिंता आता वाढल्या आहेत. काल सुनावणी दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाने याबाबत विंनती केली होती. यावर आयोगाने काल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता एका आठवडयानंतर पुन्हा सुनावणी आहे. याबबत आयोग काही निर्णय देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….